शहर-उपनगरात सर्रास ठिकाणी असलेल्या विद्युत वाहिन्या-फ्युज बॉक्स बनले जीवघेणे
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरात सर्रास ठिकाणी पथदिपांचे फ्युज बॉक्स उघडय़ावर असून लोंबकळणाऱया विद्युत वाहिन्या व फ्युज बॉक्स जीवघेणे बनले आहेत. यरमाळ रोड, संभाजी महाराज चौकात केवळ चार फुटांवर फ्युज बॉक्स लटकत असून लहान मुलांना धोकादायक बनले आहे. त्यामुळे फ्युज बॉक्स व्यवस्थित करण्याची सूचना पथदीप सुरू करणाऱया कामगाराला केली असता, फ्युज बॉक्स बदलण्यासाठी त्याने नागरिकांकडे पाचशे रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार होत आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असून डेकोरेटिव्ह दिवे व सुशोभिकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. शहर आणि उपनगरांतील पथदिपांची देखभाल महापालिकेकडून करण्यात येते. पथदीप सुरू व बंद करणे तसेच दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेने कंत्राट पद्धतीने दिली आहे. पण शहरातील पथदिपांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने निम्मे पथदीप बंद असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदीप दुरुस्त करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अलीकडे धोकादायक आणि जीवघेण्या विद्युत वाहिन्या आणि पथदिपांचे फ्युज बॉक्स बदलण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी फ्युज बॉक्स खराब झाले असून काही ठिकाणी फ्युज बॉक्स काढून थेट वायर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वायरद्वारा पथदीप बंद व सुरू करण्यात येत आहेत. पण सदर विद्युत वाहिन्या खराब झाल्या असून लेंबकळलेल्या अवस्थेत आहेत.
यरमाळ रोड येथील धर्मवीर संभाजी चौकात असलेल्या खांबावर पथदीप सुरू करण्याचा फ्युज बॉक्स बसविण्यात आला आहे. पण बॉक्समधून फ्युज बाहेर लोंबकळत असून लहान मुलांच्या हाताला लागत आहे. शेजारी दुकाने असल्याने या ठिकाणी लहान मुलांना आणि ये-जा करणाऱयांना धोका निर्माण झाला होता.
पाचशे रुपयांची कामगाराकडून मागणी
परिसरातील नागरिकांनी सदर फ्युज बॉक्स व्यवस्थित करण्याची सूचना पथदीप सुरू करणाऱया कामगाराला केली. पण सदर फ्युज बॉक्स बदलण्यासाठी कामगाराने नागरिकांकडे पाचशे रुपयांची मागणी केल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे लोंबकळणारा फ्युज बॉक्स नागरिकांनीच दोरीने खांबाला बांधला आहे. तो अद्यापही दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे उघडय़ावरील फ्युज बॉक्समुळे अनर्थ घडण्याची शक्मयता आहे. स्मार्ट सिटी योजनेमधून डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्च करण्यात येत असून धोकादायक फ्युज
बॉक्स बदलण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.