वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज तसेच आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळणारा टी.नटराजन याने गुरूवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नटराजनने आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱयांचे आभार मानले आहे.
भारतामध्ये अर्धवट स्थितीत तहकूब करण्यात आलेल्या 14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत टी. नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. गेल्या एप्रिलमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही दुखापत झपाटय़ाने बरी होत आहे.