दहाजणांचा मृत्यू : सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 920 : आतापर्यंत 20 हजार 462 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चढताच राहिला आहे. मंगळवारी नव्याने 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 10 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात नव्याने 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 27 हजार 082 झाली आहे. बरे झालेल्या 531 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत जिल्हय़ात एकूण 20 हजार 462 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 694 जणांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ात 5 हजार 920 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमधून 386 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 332 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 54 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
मंगळवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड- 44, दोडामार्ग- 63, कणकवली- 97, कुडाळ- 112, मालवण- 88, सावंतवाडी- 83, वैभववाडी- 12, वेंगुर्ले- 46, जिल्हय़ाबाहेरील- पाच.
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड- 3131, दोडामार्ग-1774, कणकवली- 5401, कुडाळ- 5385, मालवण- 3609, सावंतवाडी- 4095, वैभववाडी- 1244, वेंगुर्ले- 2285, जिल्हय़ाबाहेरील- 158.
सक्रिय रुग्ण : देवगड- 747, दोडामार्ग- 342, कणकवली- 864, कुडाळ- 1310, मालवण- 1107, सावंतवाडी- 878, वैभववाडी- 200, वेंगुर्ला- 447, जिल्हय़ाबाहेरील- 25.
आजपर्यंतचे मृत्यू : देवगड- 93, दोडामार्ग- 20, कणकवली- 146, कुडाळ- 101, मालवण- 108, सावंतवाडी- 115, वैभववाडी- 48, वेंगुर्ले- 61, जिल्हय़ाबाहेरील- दोन.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने – आजचे 1,059, एकूण 98,584, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 19,161. ऍन्टिजन टेस्ट – तपासलेले नमुने आजचे 4,241, एकूण 67,776, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 8,082.
आणखी दहाजणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्हय़ात आणखी दहाजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष तर मातोंड येथील 65 वर्षीय महिला, कुडाळ-अणाव येथील 51 वर्षीय महिला, कणकवली-आयनल येथील 70 वर्षीय महिला, देवगड येथील 84 वर्षीय पुरुष, वैभववाडी-गडमठ येथील 78 पुरुष, सावंतवाडी-सांगेली येथील 72 वर्षीय पुरुष यांचा सामावेश असून हे मागील 24 तासातील 7 मृत्यू आहेत व यापूर्वीचे 3 मृत्यू असून त्यांची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही. uration