वृत्तसंस्था / बार्सिलोना
स्पेनच्या फुटबॉल क्षेत्रातील अव्वल समजल्या जाणाऱया एफसी बार्सिलोना फुटबॉल क्लबने 32 वर्षीय सर्जिओ ऍग्युरोबरोबर नवा करार केला आहे. बार्सिलोनाने 2023 पर्यंत ऍग्युरोला करारबद्ध केले आहे.
ऍग्युरो यापूर्वी मँचेस्टर सिटी क्लबकडून खेळत होता. तब्बल दहा वर्षांनंतर बार्सिलोना क्लबला ऍग्युरोबरोबर करार करण्याची संधी यावेळी मिळाली. या करारापोटी बार्सिलोना एफसी संघाला 122 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मोजावी लागली आहे. ऍग्युरोने आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत विक्रमी 260 गोल नोंदविले आहेत. प्रिमियर लीग स्पर्धेत खेळताना त्याने मँचेस्टर सिटीकडून 275 सामन्यांतून 184 गोल नोंदविले आहेत.