ऑनलाईन टीम / लंडन :
अमेरिका आणि युरोपियन युनियन पाठोपाठ आता ब्रिटननेही 12 ते 15 वयोगटातील मुलांना फायझरची कोरोना लस देण्यास मंजुरी दिली आहे.
ब्रिटनच्या औषध नियामकाने शुक्रवारी सांगितले की, 12 ते 15 वयोगटातील मुलांना फायझरची कोरोना लस देण्यास आम्ही परवानगी दिली आहे. मात्र, आता ब्रिटनच्या लसीकरण रोल-आउट योजनेचा एक भाग म्हणून या वयोगटाला लस द्यायची की नाही, हे आता देशाच्या लसीकरण विषयक संयुक्त समितीवर (जेसीव्हीआय) अवलंबून असेल.
12-15 वर्षांच्या मुलांना अमेरिकेत आधीच फायझरची लस देण्यात येत आहे. तर फ्रान्स आणि जर्मनीने या महिन्यात 12-15 वयोगटाला लस देण्याची योजना आखली आहे.