प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव आनंदनगर येथील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले. येथील पहिला, दुसरा, तिसरा क्रॉस व साई कॉलनी येथील रहिवाशांना ही लस देण्यात आली. येथील शिवमंदिरात ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती या लसीकरण मोहिमेत 210 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष मल्लाप्पा कुंडेकर होते. यावेळी छ. शिवाजी मंडळाचे नूतन अध्यक्ष मनोज पवार, शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बळीराम कानशिडे, सचिव पी. ए. पाटील, संतोष पवार, राजेश पाटील, अमृत मिरजकर, बाळू तमुचे, आनंद जाधव, मोहन पाटील, मधुकर सुतार, मनोहर धामणेकर, उमेश मायनाचे, चंद्रकांत धुडूम, प्रशांत कंग्राळकर, अनिल गोकाक, बाळासाहेब कोकरे, सीताराम वेसने आदी नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन मोहीम यशस्वी केली.