जगाच्या विविध देशांमध्ये लोक विविध परंपरांचे पालन करतात. जगात माणसांवरील अत्यंसंस्कारही वेगवेगळय़ा प्रकारे केले जाते. दक्षिण अमेरिकेत एक असा समुदाय आहे, जो माणसाच्या अंत्यसंस्कारांनतर राखेचे सूप तयार करून त्याचे सेवन करतो. या समुदायाचे नाव यानोमानी आहे.
या समुदायाच्या लोकांसाठी ही सामान्य बाब आहे. या समुदायाचे लोक स्वतःच्या कुटुंबातील मृत लोकांचे मांसही खात असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येतो. दक्षिण अमेरिकेत यानोमानी समुदाय राहतो. या समुदायाला यानम किंवा सेनेमा या नावानेही ओळखले जाते.
दक्षिण अमेरिकेसह हा समुदाय व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या काही भागांमध्ये आढळून येतो. या आदिवासी समुदायाची संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा खूपच भिन्न आहे. या समुदायाचे लोक स्वतःची संस्कृती आणि परंपरांचे पालन करतात.
या समुदायात अंत्यसंस्कार करण्याची अजब परंपरा आहे. या परंपरेला एंडोकॅनिबेलिज्म म्हटले जाते. या परंपरेचे पालन करण्यासाठी या समुदायाचे लोक स्वतःच्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे मांस खात असतात. या समुदायात कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह पाने आणि अन्य गोष्टींना झाकला जातो. त्यानंतर तो मृतदेह जाळला जातो. दहनानंतर निर्माण झालेल्या राखेचे सूप तयार करून या समुदायाचे लोक ते पित असतात.
कुणाच्याही मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचे रक्षण केले जावे अशी मान्यता असल्याने यानोमानी समुदायाचे लोक असे करत असतात. एखाद्या नातेवाईकाने संबंधिताचे शरीर खाल्ले तरच आत्म्याला शांती मिळते असे या समुदायात मानले जाते. याचमुळे या समुदायाचे लोक अंत्यसंस्कारानंतरही राखेला कुठल्या न कुठल्या प्रकारे खात असतात. असे केल्यास मृत व्यक्तीला शांती मिळते असे ते मानतात. एखाद्या व्यक्तीची हत्या कुठल्याही शत्रू किंवा नातेवाईकाने केल्यास त्याचा अंत्यसंस्कार वेगळय़ा पद्धतीने केला जातो. या स्थितीत केवळ महिलाच राखेचे सेवन करतात.