कामाला प्रारंभ ः भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी
प्रतिनिधी/ बेळगाव
भाकड काळातील जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्हय़ात गो-शाळा उभारली जात आहे. हुक्केरी तालुक्मयातील बेळवी गावात तब्बल 19.4 एकरात या गो-शाळेचा विकास साधला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाकड काळातील जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शासनाने राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये गो-शाळा उभारण्याला मंजुरी दिली आहे. बेळगाव जिल्हय़ातदेखील गो-शाळेच्या कामाला प्रारंभ झाला असून येत्या तीन महिन्यात गो-शाळेचे पूर्ण होईल, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे. भू-संपादनानंतर गो-शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. तब्बल 200 जनावरांची क्षमता असणारी मोठी गो-शाळा उभारली जाणार असल्याने भाकड काळातील जनावरांना आसरा मिळणार आहे. याबरोबरच आजारी आणि काही व्याधी असलेल्या जनावरांनादेखील गो-शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्यावर उपचार आणि देखभाल करण्याची जबाबदारी खात्यावर असणार आहे. यासाठी गो-शाळेत तज्ञ पशुवैद्यकीय आणि कर्मचाऱयांची नियुक्तीदेखील केली जाणार आहे.
महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेशच्या धर्तीवर गो-शाळा उभारली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाकड जनावरांच्या संगोपनाबरोबर जनावरांच्या दूध आणि शेणापासून इतर उपपदार्थ तयार केले जाणार आहेत. विशेषतः सेंद्रीय खत, बायोगॅस प्रकल्प आणि इतर उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यात गो-वंशीय प्राण्यांच्या वाहतूक आणि कत्तलीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीदेखील चोरून प्राण्यांची वाहतूक आणि कत्तली सुरू आहेत. मात्र गो-शाळा उभारल्यानंतर या सर्व प्रकारांना आळा बसणार आहे. हुक्केरी तालुक्यात सुसज्ज अशी गो-शाळा उभारली जात असल्याने जनावरांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दूध संपलेली अर्थात भाकड काळातील जनावरे व्यापाऱयांमार्फत कत्तलखान्यांकडे पाठविली जातात. अलीकडे या जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र, गो-शाळा उभारल्यानंतर या सर्व जनावरांना गो-शाळेत आणले जाणार आहे. शिवाय त्यांच्यावर उपचार आणि इतर सुविधा पुरवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
प्रतिक्रिया
जिल्हय़ासाठी हुक्केरीमध्ये गो-शाळा उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सुसज्ज अशी गो-शाळा उभारली जाणार असल्याने जिल्हय़ातील सर्व भाकड जनावरांचा प्रश्न दूर होणार आहे. येत्या तीन महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली आहे.
डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)