मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून विठ्ठलापूर मंदिरात अभिषेक : शाळकरी मुलांचा दिंडीत सहभाग
प्रतिनिधी /सांखळी/डिचोली
‘अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर’ म्हणत संपूर्ण गोव्यातील विठू भक्तांची पाऊले आपल्या परिसराती विठ्ठल मंदिरात वळताना पाहायला मिळाली. डिचोली-सत्तरी तालुक्मयातील हरी भक्तांचे प्रति पंढरपूर म्हणजे सांखळी विठ्ठलापूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात रविवारी आषाढी एकादशीनिमित्त भक्तांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री विठ्ठल मूर्तीला मुक्त अभिषेक करत धार्मिक पूजन केले. शाळकरी मुलांनीही या उत्सवात सहभागी होऊन दिंडी सदर केली. डिचोली आणि सत्तरी तालुक्मयातील विविध ठिकाणच्या दिंडी पथकांनी पायीवारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिषेक
गोव्याचे मुख्यमंत्री आणि सांखळी मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिर जाऊन मूर्तीवर मुक्त अभिषेक केला. तसेच मंदिरात धार्मिक पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. देवभक्ती आणि ईश्वर शक्ति प्राप्त करून आपण सामाजिक जीवनात कित्येक कामे करू शकतो. त्यासाठी संघटितपणा आवश्यक असतो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळातही मंदिर परिसरात ज्या प्रकारे भक्तीचा मळा फुललेला पाहून मन प्रसन्न येते. पावसाची पर्वा न करता हरिनामाच्या गजरात नाचत येणारे भक्त खरच अभिनंदनास पात्र ठरतात, असे उद्गार यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
विविध लोकप्रतिनिधींनीही घेतले विठ्ठलाचे दर्शन
डिचोली-सत्तरी तालुक्मयातील आमदार, माजी सरपंच, पंच, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी ही आषाढी एकादशीला सांखळी येथील विठ्ठल मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. शाळकरी मुलांनी संतांची वेषभूषा साकारत दिंडी सादर केली. सुर्ल, वेळगे, होंडा, वळपई, पर्ये, सांखळी, डिचोली आदी परिसरातिल महिला पथकांनी चालत दिंडी सादर केली. सांखळी विठ्ठल मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. व्यास जावडेकर यांच्या दुकानापर्यंत देव दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती.
‘तरुण भारत’कडून लाईव्ह कव्हरेज
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगही सोशल मीडियावर करताना दिसत आहे. आज सांखळी विठ्ठल मंदिरातील आषाढी एकादशीचा सोहळा थेट हरी भक्तांना ‘तरुण भारत’ने फेसबुक लाईव्ह करून दाखविला. त्यामुळे आम्हाला सकाळीच थेट श्री विठ्ठलाचे दर्शन घरातून घेता आले. तसेच पंढरपूर येथील विठ्ठल दर्शन तसेच तेथील सोहळय़ाचा लाभ आम्हाला घेता आला. याबाबत तरुण भारत सोशल मीडिया टीमचे गोव्यातील विठ्ठल भक्तांनी कौतुक केले.
विठ्ठलापूर सांखळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची वारी
‘जय जय पांडुरंग हरी’ ‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात विठ्ठलापूर साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेकडून विठ्ठलापूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत या चिमुकल्यांनी वारकऱयांचा वेष करून विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षकांचाही उत्साह मोठा होता.