धोका टाळण्यासाठी नियमित पाहणी आवश्यक
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली तालुक्मयातील विविध खाण कंपन्यांनी खोलवर मारून ठेवलेले खाण खंदक सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कठोकाठ भरले आहेत. आता सदर खंदकांवर सरकारी अधिकारी तसेच खाण अधिकाऱयांकडून नियमित पाहणी करून निरिक्षण ठेवणे आवश्यक बनले आहे. मात्र उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी खंदकांपासून काहीच धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारच्या खाण लीज खाली करण्याच्या आदेशानंतर खाण कंपन्यांनी आपले सर्व सामान इतरत्र हलविले आहे. त्यामुळे खाणींवर मनुष्यबळ कमीच आहे. त्यामुळे या धोकादायक खाण खंदकांवर नजर ठेवण्यासाठी सरकारलाच अधिकाऱयांना सतर्क करावे लागणार आहे.
सरकारने खाण लीजक्षेत्र खाली करण्याचा आदेश सर्व खाण कंपन्यांना दिल्यानंतर खाण कंपन्यांनी आपापल्या लीजक्षेत्रातील सामान व यंत्रसामग्री हटविण्यास प्रारंभ केला. त्यातच खाण खंदकातील पंपही बंद करून ते हटविण्यात येत असतानाच खाण खंदकातील पाण्यामुळे गावांच्या डोक्मयावर असलेला धोका सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने या पावसाळय़ात सदर खंदकांच्या देखरेखीची जबाबदारी संबंधित खाण कंपन्यांकडेच दिली होती. त्यामुळे खाण कंपन्यांनी या खाण खंदकातील पंप यंत्रणा कार्यान्वति ठेवली होती.
आता सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खाण खंदक काठोकाठ भरले आहेत. पंप यंत्रणा सुरूच आहेत. मात्र त्यावर देखरेख कोणाची आहे, याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. डिचोलीचे मामलेकर लक्ष्मीकांत कुट्टीकर हे या विषयी सर्व ती माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱयांकडून मिळवत आहे. तरीही प्रत्यक्ष खाण खंदकांवर किय परिस्थिती आहे याची शाहनिशा करून घेणे आवश्यक आहे.
सुरक्षेच्याबाबतीत नियोजन नाही
खाण कंपन्यांच्या देखरेखीखाली असताना कंपन्यांकडून पंप यंत्रणा अविश्रांत चालूच ठेवली जायची. उलट खाणींवर त्याची यंत्र सामुग्रीही असायची. त्यामुळे जर एखाद्या भागात माती सरकत असल्याचे दिसून आल्यास लगेच त्यावर उपाययोजना करण्यात येत होत्या. आज सदर यंत्रसामग्री खाणींवर आवश्यकतेनुसार नसल्याने ऐनवेळी धोकादायक परिस्थिती उदभवल्यास काय करणार याचे नियोजन सरकारने ठेवणे आवश्यक आहे.
त्यासाठी तज्ञ अधिकाऱयांकडून सदर पाण्याने भरलेल्या खाण खंदकांची संबंधित कंपनी अधिकाऱयांसह पाहणी करून प्रत्यक्षातील परिस्थिती जाणून घ्यावी. तसेच पाण्याचे पंपिंग सध्या खाण खंदक भरत असल्याच्या कितीपट अधिक होत आहे की नाही याचीही शाहनिशा करणे आवश्यक आहे.
खाण खंदकांचा काहीच धोका नाही – उपजिल्हाधिकारी
डिचोली तालुक्मयातील खाण खंदकांमध्ये सध्या भरत असलेल्या पाण्यावर सरकारी यंत्रणेची नजर आहे. या खंदकांचे जिल्हाधिकारी मामू हागे यांच्यासह खाण खात्याचे अधिकारी, संबंधित खाण कंपन्यांचे अधिकारी, मामलेकर, जलस्रोत खात्याचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पावसाळय़ात करण्यात यावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली होती. त्याप्रमाणे सर्व त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. खंदकांमधील पाण्याचे पंपिंगही चालूच आहे. त्यामुळे कोणताही धोका सध्यातरी नाही. असे उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.