न्हावेली / वार्ताहर
मळेवाड जकातनाका येथे चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडली मात्र दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे .आजगाव कळणी येथील बाबी काळोजी हे आपली स्वत : ची प्लेजर दुचाकी घेऊन मळेवाडच्या दिशेने जात असताना अचानक गाडीने पेट घेतला यातून सुदैवाने बाबी काळोजी हे बालबाल बचावले . मात्र गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे गाडीने अचानक पेट घेण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही .