तिघा मारेकऱयांना अटक : मोटारसायकल-शस्त्र जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
रायबाग येथील शिवाजी पार्कजवळ वृद्धाचा खून केल्याच्या आरोपावरून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर 24 तासांत मारेकऱयांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून एक मोटारसायकल व शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत.
शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्री महादेव मल्लाप्पा हुरळी (वय 60) रा. रायबाग याचा खून करण्यात आला होता. महादेवच्या मुलाने रायबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱयांनी तिघा जणांना अटक केली आहे.
प्रभाकर सदाशिव मगदूम, रा. करोशी, लक्ष्मण निंगाप्पा अळगुंडी, रा. बेल्लद बागेवाडी, शंकर बाळाप्पा पाच्छापुरे, रा. केंचनट्टी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.