खरेदीला नागरिकांमध्ये उधाण : बाजारपेठेत लाखोंची उलाढाल : इलेक्ट्रॉनिक वस्तुंबरोबर दुचाकी खरेदीही जोरात : अनेक ठिकाणी वाहतूक केंडी
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/23di-5-1024x461.jpg)
प्रतिनिधी /बेळगाव
प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. बाजारात दिवाळीसाठी किराणा, आकाश कंदील, फळे, फुले, सुका मेवा, दिवे, पणती, ऊस यासह इतर साहित्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे रविवारी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवारी शासकीय सुटी असल्याने मोठय़ा प्रमाणात नागरिक बाजारात आले होते. त्यामुळे बाजारपेठेला बहर आला होता.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/23di-24-1024x461.jpg)
तिमिराकडून तेजाकडे नेणाऱया दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी किराणा दुकाने, इलेक्ट्रॉनिक, मिठाई आणि कापड दुकाने, गृहोपयोगी वस्तुंची दुकाने, बुक डेपो, किरकोळ फूल विपेते, आकाश कंदील, दिवे विपेत्यांकडे नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळ आणि दुपारच्या सत्रातच खरेदीवर भर दिला. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठ नागरिकांनी गजबजली होती. तयार फराळ, आकाश कंदील, कपडे, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आदी खरेदीत नागरिक दंग झाले होते.
बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, किर्लोस्कर रोड, मेणसी गल्ली, काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली आदी भागात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. किराणा दुकानांबरोबर कपडे, मिठाई, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि इतर शोरूममध्येही नागरिकांची गर्दी झाली होती. दिवाळीला नवीन साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे मोबाईल, टीव्ही, संगणक, फ्रीज, एसी या इलेक्ट्रॉनिक वस्तुंबरोबर दुचाकी खरेदीला उधाण आले होते.
पूजा साहित्याला मागणी
सोमवारी लक्ष्मीपूजन असल्याने अगरबत्ती, कापूर, नारळ, लक्ष्मीच्या मूर्ती, सुगंधी उटणे, मेणबत्ती, तेल आदी पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. त्याबरोबर विविध फळांचीदेखील मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. 100 रुपयांना 5 फळे याप्रमाणे विक्री सुरू होती. विशेषतः दिवाळीत कोहाळय़ांची अधिक खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत कोहाळय़ांची आवक वाढली होती. 100 रुपयांना 1 याप्रमाणे कोहाळा विकला जात होता.
रविवारी शासकीय सुटीचा दिवस असल्याने आबालवृद्धांसह नागरिक खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते. नोकरदार वर्गासह महिला दिवाळीच्या खरेदीत दंग झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर दिवाळीत बालचमुंचे आकर्षण असलेल्या शिवरायांच्या प्रतिकृतींनाही मागणी वाढली होती. त्यामुळे शिवराय, मावळे, बुरुज आदी प्रतिकृतींची खरेदी झाली.
उसाची आवक
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/23di-7-1024x461.jpg)
बाजारात लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी उसाची आवक वाढली होती. नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस, बेळगाव-वेंगुर्ला रोड, कडोलकर गल्ली, बसस्टँड रोड आदी ठिकाणी उसाची विक्री सुरू होती. साधारण 70 ते 80 रुपयांना 5 ऊस विकले जात होते. बाळेकुंद्री, मुतगा आदी भागातून ऊस दाखल झाले होते.
पावसाची उघडीप
रविवारी शासकीय सुटी व त्याचबरोबर पावसानेही बऱयापैकी उघडीप दिल्याने नागरिक खरेदीसाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडले होते. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी झाली होती. परिणामी काही ठिकाणी वाहतूक केंडी झाल्याने त्या कोंडीतून बाहेर पडताना नागरिकांची दमछाक झाली.
घर सजावटीसह पूजेसाठी फुलांना मागणी…
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/23di-4-1024x461.jpg)
दिवाळीत घर सजावट आणि पूजेसाठी फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे रविवारी हार-फुलांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. विशेषतः झेंडुंच्या फुलांना अधिक पसंती होती. किरकोळ बाजारात 160 रुपये किलोप्रमाणे झेंडुंच्या फुलांची विक्री सुरू होती. फूल मार्केटमध्ये झेंडुंच्या फुलांची आवक वाढली होती. त्याबरोबर मोठय़ा प्रमाणात विक्री होऊन उलाढाल वाढली होती.