प्रतिनिधी
बांदा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. गेले काही दिवस या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटतआहेत. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बांदाच्या वतीने बांदा शहरात येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. श्री देव बांदेश्वर मंदिर, आळवाडी, गांधीचौक, कट्टा कॉर्नर, बांदा बसस्थानक व छत्रपती शिवाजी स्मारक गडगेवाडी अशी रॅली काढण्यात आली.
यावेळी मराठा समाज बांदा अध्यक्ष बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी सचिव महादेव सावंत, मकरंद तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, न्यानेश्वर सावंत, गुरू सावंत, राजा सावंत, मिलिंद सावंत, सागर सावंत, दीपक सावंत, संतोष सावंत, संदेश पटेकर, विनेश गवस, राखी कळगुटकर, माधवी गाड, लक्ष्मी सावंत, स्वाती सावंत,राकेश परब, विराज परब, स्वप्नील सावंत, शरद सावंत, जयेश सावंत, संदेश महाले, जे डी पाटील आदींसह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. रॅलीची सांगता गडगेवाडी येथे करण्यात आली. बांदा परिसरातील मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बांदा पोलीस उपस्थित होते.