राधानगरी,प्रतिनिधी
Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे शांततामय मार्गाने सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलीसांनी केलेल्या बेछूट लाठीचार्जच्या निषेधार्थ शक्रवारी (दि. 8 सप्टेंबर 2023) रोजी राधानगरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते राजेंद्र भाटळे यांनी दिली.
बुधवारी सायंकाळी ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.अत्यावश्यक सेवा व आरोग्य सुविधा वगळून सदर बंद पार पडेल.राधानगरी शहर तसेच समस्त व्यावसायिक,व्यापारी व नागरिक बंधू- भगिनींनी बंदमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.शुक्रवारी सकाळी 10 वाजता राधानगरी एसटी बसस्थानक येथून मोर्चाला सुरवात होऊन मुख्य बाजारपेठेतुन तहसीलदार कार्यालयापर्यत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या इतर मागण्याचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार आहे. तरी राधानगरी शहरातील सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्र भाटळे यांनी केले आहे.
या बैठकीस सकल मराठा समाजाचे अरविंद पोवार,विकास पाटील,प्रविण तिरवडे,मंगेश राऊत,बाळासाहेब कळमकर,सचिन भाटळे,तुषार पाटील,राजेश म्हापसेकर,अजिंक्य वाडकर,धीरज भोसले, शिवाजी किल्लेदार यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव या बैठकीला उपस्थित होते.