A social commitment organization visited a destitute elderly couple
हात फॅक्चर झाल्याकारणाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेली निराधार वृद्ध महिला तारामती शेटकर कारीवडे कुंभारवाडी तिच्या राहत्या घरी जाऊन सामाजिक बांधिलकी टीमने भेट घेतली व दोन महिने पुरेल असे सर्व प्रकारचे राशन व काही औषध पाण्यासाठी पैसे दिले तारामती शेटकर 71 व हरिश्चंद्र शेटकर 81 या निराधार दोघांची परिस्थिती अत्यंत हालक्याची आहे जेवणासाठी राशन व औषध- पाण्यासाठी त्यांच्याजवळ एकही पैसा नाही सदर दांपत्या हालेकीची जीवन जगत आहेत.सामाजिक बांधिलकीने त्यांची दखल घेऊन शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.आपणही या निराधार वृद्ध दापत्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. भटवाडी, सामाजिक बांधिलकी संघटना व राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ चे अध्यक्ष बंटी माठेकर या सर्वांच्या माध्यमातून त्यांना राशन व आर्थिक सहाय्य करण्यात आले तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर यांच्याकडून मायेची उब देणार ब्लॅंकेट देण्यात आल.यासाठी सामाजिक बांधिलकीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, संजय पेडणेकर ,समीरा खालील, रवी जाधव प्राध्यापक रुपेश पाटील कीर्ती बोंद्रे , अशोक पेडणेकर, सतीश बागवे, हेलन निबरे, ॲम्बुलन्स चालक लक्ष्मण शिरोडकर,आमीन खलील, गगन ग्रास, अजय कोळंबेकर, बंड्या केरकर, बंटी माठेकर ,वासुदेव खानोलकर, मंथेश पडते या सर्वांनी या उपक्रमात मोलाचा सहभाग दर्शविला.
तर सामाजिक बांधिलकीचे समीरा खालील यांनी निराधार वृद्ध दांपत्यांना पेन्शन मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी या नंबर वर संपर्क साधा कॉल 94052 64027 ,जी पे 95520 12651 (Ravindra jadhav)
सावंतवाडी / प्रतिनिधी