कट्टा : वार्ताहर
मालवण -कट्टा पेट्रोल पंपनजीक दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला . मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेला इसम हे दोघेही जखमी झालेत . दोघांनाही उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .ठोकर दिलेली चारचाकी गाडी महाराष्ट्र शासनाची आहे . पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा सुरु आहे .