उमेदवारांच्या प्रचाराला जोर; बाजी कोण मारणार कळणे मुश्किल
सांखळी : सांखळी मतदारसंघातील पालिका निवडणूक यंदाही रंगतदार होणार असून प्रभाग 1 मध्ये तिरंगी लढत होणार आहे. विद्यमान दोन नगरसेवकांना अपक्ष उमेदवार शह देणार का असा प्रŽ उपस्थित झाला आहे. या प्रभागात भाजपचे यशवंत माडकर, टूगेदर फॉर सांखळीच्या कुंदा माडकर आणि अपक्ष उमेदवार संतोष हरवळकर यांच्यात तिरंगी लढत होणार असून तिघांनीही प्रचाराला जोर दिला आहे. या प्रभागात महिला मतदार 369 तर पुऊष मतदार 369 मिळून एकूण 738 मतदार आहेत. यशवंत माडकर, कुंदा माडकर यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषवले आहे. दोघेही या प्रभागात अनुभवी राजकारणी आहेत. संतोष हरवळकर यांनी समाज सेवेतून राजकारणात प्रवेश केला आहे. या तिरंगी लढतीत नेमका कोण बाजी मारणार हे कळणे जरा मुश्किल झाले आहे. सांखळी नगर पालिकेचा प्रभार 1 हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जात असून या प्रभागात तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. मतदारांच्या घरोघरी गाठीभेटी, कोपरा बैठका सुरू झाल्या असून मतदारांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे हे उमेदवार सांगत आहेत. या प्रभागात आपण केलेली विकास कामे आणि होण्याच्या मार्गावर असलेली विकासकामे, सरकारी योजना, आर्थिक सहकार्य यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास तिन्ही उमेदवार व्यक्त करतात. तसेच आणखीन एक उमेदवार गितेश माडकर यांनी आपला पाठिंबा यशवंत माडकर याना जाहीर केला आहे. तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दोन माडकर विऊद्ध हरवळकर
भाजपचे यशवंत माडकर, टूगेदर फॉर सांखळीच्या कुंदा माडकर या दोन माडकर विरोधात अपक्ष उमेदवार समाज सेवक संतोष हरवळकर यांच्यात थेट लढत होणार असल्याने याचा नेमका फायदा कोणाला होईल या विषयावरही मतदारात चर्चा रंगताना ऐकायला मिळत आहे.