प्रतिनिधी /पेडणे
तिवाडा धारगळ येथे जंगली झाड आणि माड रस्त्यावर पडल्यामुळे रास्ता वाहतूक व लोकांसाठी रास्ता काही काळासाठी बंद राहिला.
झाड पडल्याची माहिती गोरख याने अग्निशामक दलाला देताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कुठलाही वेळ न घालवता अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्युत कटरचा वापर करून दोन्ही मोठी झाडे कापून रास्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
या कामगिरीत अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी सुनील देसाई, हवालदार डॉम्निक मार्टिन्स, चालक माथिएस मेंडोसा, जवान यशवंत नाईक, जवान सहदेव परब यांनी ही झाडे कापून बाजूला केली.