आचरा प्रतिनिधी
आचरा परिसरात मंगळवार रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकरी राजा सुखावला आहे. बुधवार सकाळी पारवाडी येथील दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आंब्याचे झाड पडून सुमारे सात हजाराचे नुकसान झाले.बुधवारी सकाळी आचरा पारवाडी येथील दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आंब्यांचे झाड पडून नुकसान झाले. याबाबत आचरा तलाठी संतोष जाधव कोतवाल गिरीश घाडी यांनी पंचनामा केला. यात पाडवे यांच्या घराच्या पडवीच्या छप्पराचे सुमारे सात हजाराचे नुकसान झाले.