कोणत्याही रेसिपीला चव आणखीन वाढवण्यासाठी आले वापरले जाते. आल्याचा वापर अनेक रेसिपीमध्येही केला जातो. पण बऱ्यचवेळेला आले लवकर वाळून जाते. किंवा फ्रीजमध्ये ठेवूनही अद्रक अनेकदा खराब होते.पण बहुतेक लोकांना एक समस्या असते की त्यांला नक्की कसं स्टोअर करायचे. चला तर मग जाणून घेऊया काही टिप्स .
आले फ्रीजमध्ये ठेवताना ते ओले ठेवू नका. जर आले पाण्याने धुतले असेल तर ते काही वेळ पंख्याखाली चांगले कोरडे करून मगच ते फ्रीजमध्ये ठेवावे.
जेव्हा आले फ्रीजमध्ये ठेवाल तेव्हा तुम्ही ते ब्राऊन पेपर गुंडाळून किंवा ब्राऊन पेपरच्या पिशवीत ठेवू शकता. असे केल्याने, त्यात ओलावा राहणार नाही आणि ते बराच काळ टिकेल.
आले जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी तुम्ही हवाबंद कंटेनर वापरू शकता. झिपलॉक प्लास्टिक पिशव्या देखील वापरू शकता.
सोलून किंवा कापून अद्रक फ्रीजमध्ये ठेवले तर ते सुकते आणि खराब होते. म्हणूनच आले कापून किंवा सोलून न काढता फ्रीजमध्ये ठेवू नये.
(वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)