कारवार: दोन दिवसापूर्वी येथील अरबी समुद्रात सर्वात मोठा बांगडा सापडल्याची घटना ताजी असताना, जिल्ह्यात दुर्मिळ सफेद रंगाचा अजगर जातीचा साप आढळून आला आहे. कुमठा तालुक्यातील गांधीनगर हेगडे येथील देवी नारायण मुक्री यांच्या घरी हा अजगर साप आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने सर्पमित्र पवन नाईक यांना देण्यात आली.
नाईक यांनी तो अजगर शिताफीने पकडून वन खात्याच्या अधिकाऱ्याकडे सोपविला.९.६ फुट लांबीच्या या अजगरावर किरकोळ जखमा दिसून आल्या आहेत. दुर्मिळ स्वरूपाचा या अजगराला म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाकडे पाठविण्यात आला. आज अखेर कर्नाटक राज्यात अशा प्रकारचे केवळ तीन साप आढळून आले असून या पैकी दोन साप कारवार जिल्ह्यात आढळून आले आहेत. गेल्या वर्षी कुमठा तालुक्यातील मिर्जान येथे अशा प्रकारचा साप आढळून आला होता असे सांगण्यात आले