जगातील सर्वात मोठा आयफोन असल्याचा कंपनीचा दावा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
यूट्यूबरने 7 फूट उंचीच्या आयफोनची निर्मिती केली आहे. तसेच हा जगातील सर्वात मोठा कार्यरत असणारा आयफोन असल्याचा दावा केला आहे. हा आयफोन मूळ फोनसारखा दिसत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. अमेरिकन यूट्यूबर मॅथ्यू बीमने जगातील सर्वात मोठा आयफोन बनवण्याचा दावा केला आहे, ज्याची लांबी 7 फूट आहे. तो म्हणाला, ‘मला तंत्रज्ञान आवडते आणि मी यूट्यूबरवर काही मोठे बिल्ड केले आहेत. माझ्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी मी जगातील सर्वात मोठा कार्यरत आयफोन बनवण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या अगोदर वर्ष 2020 मध्ये, यूट्यूबर झेडएचसीने जगातील सर्वात मोठा आयफोन बनवण्याचा दावा केला होता, ज्याची लांबी 6 फूट होती. तथापि, आयफोन 14 प्रो मॅक्स अधिकृतपणे सर्वात मोठा आयफोन आहे, त्याची उंची 6.33 इंच आहे.
आयफोनला डिस्प्ले बनवला
मॅथ्यू आणि त्यांच्या टीमने 7 फूट लांबीचा आयफोन डिस्प्ले टच-क्रीन टीव्हीमध्ये तयार केला आहे, जो मॅक मिनीसह एकत्र केला आहे. त्याच्या बाजूचे आणि मागील पॅनल्स मूळ आयफोनप्रमाणे डिझाइन केलेले आहेत, मॅट फिनिशसह. यासोबतच यात लॉक, व्हॉल्यूम अप-डाउन बटण आणि म्यूट बटणदेखील आहे, जे काम करते.
मूळ आयफोनप्रमाणे 7 फूट लांब
हा फोन मूळ आयफोनप्रमाणे काम करतो. 7 फूट आयफोन नेहमीच्या आयफोनप्रमाणे काम करतो. यूट्यूबर मॅथ्यू बीमने दाखवले आहे की सर्व नियमित आयफोनचीच वैशिष्ट्यो यामध्ये काम करतात, ज्यामध्ये अलार्म सेट करणे, सर्व अॅप्स वापरणे आणि अॅपल पेद्वारे पेमेंट करणे समाविष्ट आहे. यासोबतच यूट्यूबरने फोनसोबत सेल्फी घेतला आणि व्हिडिओ कॉल करून दाखवला. मॅथ्यूने भारतीय ग्राहकाकडून व्हिडिओ कॉलवर हिंदीत संवाद साधला.लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी यूट्यूबरने फोनसह न्यूयॉर्कच्या रस्त्यावर पोहोचले. जगातील सर्वात मोठा पिझ्झा बनवण्याचा दावाही केला आहे.