मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ अन् शस्त्रास्त्रs हस्तगत
वृत्तसंस्था /श्रीनगर
गुप्तचर यंत्रणांकडून पुरवियण्यात आलेल्या इनपुट्सच्या आधारावर सुरक्षा दलांकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेद्वारे मागील 15 दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये 11 विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा हस्तगत झाला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या इनपुट्सनंतर सुरक्षा यंत्रणांनी देखरेख वाढविली होती. यामुळे सुरक्षा दलांना जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीचे तीन मोठे प्रयत्न उधळण्यास यश मिळाले आहे. तसेच 11 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नियंत्रण रेषेच्या पलिकडेच नवे चेहरे सक्रीय झाल्यानंतर भारतीय सैन्याने गुप्तचर यंत्रणांसोबत मिळून कुपवाडा येथील विशिष्ट क्षेत्रांमध्ये देखरेख वाढविली आहे. माछिल सेक्टरमध्ये दोन विदेशी दहशतवाद्यांना एका कारवाईदरम्यान ठार करण्यात आले. घटनास्थळावरून दोन एके सीरिजच्या रायफल्स, ग्रेनेड आणि दारूगोळा हस्तगत झाला होता आणि तो पाकिस्तानी बनावटीचा होता. नाइट व्हिजन गॉगल्स आणि रात्रीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणीसमवेत अनेक टेहळणी उपकरणे दहशतवाद्यांकडून हस्तगत झाली आहेत. 23 जून रोजी माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळण्यास यश मिळाले होते. तेथे मारले गेलेल्या 4 विदेशी दहशतवाद्यांकडून 12 शस्त्रास्त्रs हस्तगत झाली होती. मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रांसोबत ए1 ग्रेडचे अमली पदार्थही हस्तगत झाले आहेत. या अमली पदार्थांची किंमत सुमारे 550 कोटी रुपये इतकी असावी. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयकडून अमली पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून दहशतवाद फैलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहशतवाद्यांच्या भारतातील हस्तकांचा शोध आता सुरक्षा यंत्रणांनी चालविला आहे.