पाचगाव प्रतिनिधी
पाचगाव येथील गरुड तलावाच्या काठाला सोमवार पासून बेवारस अवस्थेत हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल आढळून आली आहे . या मोटरसायकलची पुढील आणि मागील बाजूची नंबर प्लेट काढण्यात आली आहे. रस्त्यावरून तलावाच्या काठावरून ही मोटरसायकल अज्ञातानी तलावात खाली ढकलून दिली आहे. पाणी कमी असल्याने तलावाच्या काठालाच ही मोटरसायकल पडलेली आहे. पाचगाव येथील गरुड तलाव हा लोकवस्ती पासून बाहेरील बाजूला निर्जन स्थळी आहे .नंबर प्लेट काढून मोटरसायकल खाली ढकलून देण्यामागचे कारण काय याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.पाचगाव चे उपसरपंच संजय शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Previous Article१२ वर्ष रखडलेल्या टर्मिनसच काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अटळ !
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.