दोडामार्ग विजघर हेवाळेबांबर्डे राज्यमार्गावरील घटना
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
दोडामार्ग विजघर राज्यमार्गावर हेवाळेबांबर्डे येथे आज सकाळी सकाळी १०वा.च्या दरम्यान दोडामार्ग विजघर व सावंतवाडी बेळगाव या एसटी बसमध्ये एकमेकांना बाजू देत असतांना मोठा अपघात झाला.अपघातानंतर दोन्हीं एसटी बस रस्त्याकडेला जाऊन कलंडल्या.घडलेल्या अपघाताची स्थिती पाहता अपघात मोठा होता. अपघातावेळी दोन्ही एसटी बस मध्ये प्रवाशी होते.सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही .अपघातस्थळी युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, तालुका संघटक संदेश राणे, प्रकाश गावडे आदी स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.