शाहुवाडी, प्रतिनिधी
Kolhapur Accident : मलकापूर (Malkapur) येळवण जुगाई मार्गावर उचत गावच्या हद्दीत भरधाव आलेल्या सुपर कॅरी टेम्पोने रस्त्याने चालत निघालेल्या दोन युवकांना धडक दिली. झालेल्या अपघातात शाहिद शकील मालदार (वय-24) व साहिल जैनून अत्तार (वय-23) दोघेही राहणार लहीन गल्ली उचत. हे दोघे युवक गंभीर जखमी झाले .धडक देऊन टेम्पो उचत येतील घरा नजीक जाऊन धडकला.चालक धोंडीबा नाना पाटील (वय -42) राहणार धनगरवाडी याला शाहूवाडी (Shahuwadi) पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीबा नाना पाटील हे चालक सुपर कॅरी टेम्पो मलकापूरच्या दिशेने भरधाव घेऊन उचत दिशेनजात होते.त्यांनी मलकापूर येथे एक नागरी कास धडक देऊन उचत येते दूध आणण्यासाठी रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या शाहिद मालदार व साहील अत्तार यांना जोराची धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दोन्ही अपघातग्रस्त युवकांच्या डोक्यावरच्या टोप्या चालकाच्या केबिन नजीक पडल्याचे घटनास्थळी दिसत होते.याही स्थितीत भरधाव सुपर कॅरी टेम्पो घेऊन सदरचालकाने उचत येतील वळणावरच्या घराला धडक दिली.चालकाच्या बेदरकारपणानेच अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
रिक्षा चालकाची तत्परता
दरम्यान, अपघातग्रस्त सुपर कॅरी टेंप्मोने काही वेळापूर्वीच रिक्षाला ओहर टेक करून रिक्षा पासून काही अंतरावरच हा अपघात घडला.रिक्षात असलेली लहान मुलं अपघात बघून भेदरली.रिक्षा चालक संतोष लांबोरे याने तात्काळ मुलांना खाली उतरून जखमी दोन्ही युवकांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.घटनास्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली.