पुलाची शिरोली, प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील ग्नँट फौंन्ड्री समोर डंपरने कारला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक महिला जखमी झाली. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हि घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. कुटुंबातील सर्व प्रवासी पलुस जि.सांगली येथील आहेत.
शंकर बुदाले रा.पलुस हे पलुसहून कोल्हापूर येथे नातेवाईकांच्याकडे कुटुंबातील सर्वांना घेवून निघाले होते.त्यांच्या पाठीमागून टोप येथील समर्थ स्टोन क्रशर कंपनीचा डंपर भरधाव वेगाने आला होता.ग्नँट फौंन्ड्री समोर डंपरची कारला पाठीमागून जोरात धडक बसली.या धडकेत कार सेवामार्गावर पलटी झाली. तर डंपर डिव्हायडरवर जावून बंद पडला.यामुळे कार मधील सौ.संध्या शंकर बुदाले (वय- ५०) यांच्या डोक्याला मुक्का मार लागून जखमी झाल्या. इतर कोणालाही इजा झालेली नाही. पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी स.पो.नि.पंकज गिरी यांनी तत्काळ येवून जखमी महिला व इतरांना कोल्हापूरमध्ये खाजगी दवाखान्यात पाठवले. अपघात घडताच डंपर चालक पळून गेला.