अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान
संगमेश्वर प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर सोनवी पुलावर मारुती सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती. हा अपघात गुरुवार सकाळी 10:50 च्या दरम्यान घडला आहे.पुलावर अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे. सोनवी पूल हा अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. काही दिवसापूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्री च्या दिशेने जाणारे क्रेटा गाडी आणि रत्नागिरी हुन डेरवणला च्या दिशेने जाणारी गाडी या गाड्यांमध्ये अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे किशोर जोयशी, शेलार , आदींसह ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जावून गाडया बाजूला केल्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालू झाली.