सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख
बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी आणि मग बेरोजगारीचे दुःख काही नवे नाही. कित्येक वर्षे काम करणारे अनेक कलाकार देखील काही काळानंतर कामासाठी वणवण भटकू लागतात. अशाच प्रकारचे दुःख सध्या अभिनेत्री आंचल सिंह झेलत आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2023/01/anchal2.jpg)
आंचल मागील 12 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे, परंतु मागील 6 महिन्यांपासून तिला कामच मिळालेले नाही. आंचलने सोशल मीडियावर स्वतःचे दुःख व्यक्त केले आहे. आंचलने यापूर्वी ‘ये काली काली जुल्फें’ आणि ‘अनदेखी सीझन 2’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ज्या लोकांना भेटते ते सध्या काय काम करत आहेस अशी विचारणा करतात. परंतु मागील 6 महिन्यांपासून मला कामच मिळालेले नाही. अनेकांना फोन करून काम द्या अशी विनंती केली, परंतु यातही निराशाच हाती लागल्याचे आंचलने सांगितले आहे.
आंचलने सुमारे 400 जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच पंजाबी, तमिळ आणि श्रीलंकन चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. मागील दोन सीरिजमधील माझ्या अभिनयाला पसंतीही मिळाली, तरीही 6 महिन्यांपासून घरी बेरोजगार म्हणून बसली आहे. माझ्याकडे कुठलेच काम नाही आणि हे निराशानजक असल्याचे ती म्हणाली. आंचल सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. आंचलचे इन्स्टाग्रामवर 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.