‘द केरळ स्टोरी’मधील अदा शर्माचा अभिनय चाहत्यांना अत्यंत पसंत पडला आहे. एकीकडे तिचा हा चित्रपट यशाचा इतिहास रचत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीने आता नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. अदा लवकरच ‘द गेम ऑफ गिरगिट’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट ब्ल्यू व्हेल गेमवर आधारित आहे. या गेमला व्हेल चॅलेंज देखील म्हटले जाते. हा एक इंटरनेट गेम असून त्यात कथितपणे 50 दिवसांच्या कालावधीदरम्यान गेमर्सना सोपविण्यात आलेल्या कामांची एक सीरिज सामील असते, ज्यात अखेरीस आव्हानाच्या स्वरुपात गेमर्सला आत्महत्या करावी लागते. अदा शर्मासोबत या चित्रपटात श्रेयस तळपदे हा मराठमोळा अभिनेता दिसून येणार आहे. या चित्रपटात अदा शर्मा एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडकडून केली जात आहे. तर विशाल पंड्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘द गेम ऑफ गिरगिट’ चित्रपटात मी एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर दर्शील सफारीसोबत आणखी एका चित्रपटात मी काम करत आहे. हा एक थ्रिलर स्वरुपाचा चित्रपट असल्याचे अदाने म्हटले आहे.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.