युक्रेनच्या पुनउभारणीकरता मदत करणार जर्मनी
रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला मोठे नुकसान पोहोचले आहे. विकासाच्या वाटेवर असलेला देश बॉम्बवर्षाव आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी उद्ध्वस्त झाला आहे. मोठमोठय़ा इमारती बॉम्ब तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांनी नष्ट झाल्या आहेत. अशा स्थितीत जर्मनीने युक्रेनच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जर्मनीने युक्रेनमधील पायाभूत सुविधांच्या पुनर्निर्मितीकरता अतिरिक्त 37 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. जर्मनीचे आर्थिक विकासमंत्री स्वेंजा शुल्ज यांनी यासंबंधी माहिती घरांची निर्मिती आणि पॉवरग्रिड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ही मदत केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनला अंतर्गत स्वरुपात विस्थापित लोकांसाठी तत्काळ घरांच्या निर्मितीची तसेच पॉवरग्रिडची गरज आहे. जर्मनीने आपत्कालीन कार्यक्रमाच्या हिस्स्याच्या स्वरुपात या कार्याकरता निधी पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे शुल्ज यांनी म्हटले आहे.
22.5 दशलक्ष युरोंचा वापर पॉवर ग्रिड पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तर 12.4 दशलक्ष युरोचा निधी घरांच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. तसेच दोन दशलक्ष युरोचा वापर युक्रेनला वैद्यकीय उपकरणे पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील पायाभूत सुविधांना सुमारे 60 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.