कोल्हापूर प्रतिनिधी
अभ्यासू, वाखाणण्याजोगे व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाया अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी येथे काढले. तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे होणारी पोकळी नेहमी जाणवत राहील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित सदिच्छा समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, माजी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, अपर जिल्हाधिकारी पवार यांच्या पत्नी रश्मी पवार यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांचा जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व करवीर निवासीनी अंबाबाईची प्रतिमा भेट देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, प्रशासनात अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकायांची सोबत असेल तर निश्चितच नागरिकांना चांगली सेवा देता येते, याची प्रचिती किशोर पवार यांच्या कामातून आली. महसूल विभागातील जमीन, गौण खनिज यासह विविध विषय मार्गी लावण्यामध्ये पवार यांचा वाटा महत्वपूर्ण आहे. महसूल विभागात काम करताना प्रत्येक विषय अभ्यासूपणे मार्गी लावण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आहेत.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी त्यांनी सूक्ष्म नियोजन केले. योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करुन रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
अपर जिल्हाधिकारी किशोर पवार म्हणाले, महसूल विभाग हा शेतकयांच्या जिव्हाळ्याचा विभाग आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून आजवर काम केले आहे. ’जग खूप चांगलं आहे, जगाकडे चांगल्या नजरेतून बघा, जग चांगलं दिसेल. स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढत आहे. अशावेळी गतीने आणि प्रामाणिकपणे काम पूर्ण करा.
यावेळी माजी निवासी उपजिल्हाधिकारी जाधव, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कवितके, प्रांताधिकारी वाघमोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगते व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.