मार्केट, खडेबाजार पोलीस स्थानकांना भेट : पोलीस अधिकाऱयांची घेतली बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार हे सध्या वेगवेगळय़ा जिल्हय़ांच्या दौऱयावर आहेत. शुक्रवारी ते बेळगावात दाखल झाले असून रात्री त्यांनी पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली.
शुक्रवारी सकाळी हुबळी-धारवाडला भेट देऊन अलोककुमार यांनी तेथील पोलीस अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. सायंकाळी बेळगावला येताना त्यांनी कित्तूर पोलीस स्थानकाला भेट दिली. यावेळी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी आदी अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले.
अधिकारी व पोलिसांशी चर्चा करून अलोककुमार यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यापूर्वी त्यांनी बेळगाव जिल्हय़ात सेवा बजावली आहे. पोलीस मुख्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर अलोककुमार यांनी मार्केट पोलीस स्थानकाला भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मार्केटनंतर रात्री अलोककुमार यांनी खडेबाजार पोलीस स्थानकालाही भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली. यावेळी खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर आदी अधिकाऱयांनी त्यांचे स्वागत केले. वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने कशी कामे हाती घ्यावीत, या संबंधी त्यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.