खानापूर येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे आम आदमी पक्षाचा इशारा
बातमीदार /खानापूर
खानापूर तालुक्मयातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. आवश्यक ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी म्हणून अनेकवेळा मागणी करण्यात आली. परंतु अद्याप संबंधित ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नाही. येत्या काही दिवसात आवश्यक ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पक्षाच्या तालुका पदाधिकाऱयांनी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदारांना शुक्रवारी निवेदन देऊन देण्यात आला.
खानापूर सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये दोन डॉक्टरांची कमतरता आहे. नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये दोन डॉक्टरांची तसेच पारिश्वाड येथील आरोग्य केंद्रात एका फार्मासिस्टची कमतरता आहे. वरील ठिकाणी डॉक्टर व फार्मासिस्टची कमतरता असल्याने जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळणे कठीण झाले आहे. सरकारी दवाखाना असूनही डॉक्टरांच्या कमतरतेअभावी नागरिकांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यासाठी लवकरात लवकर वरील ठिकाणी डॉक्टर व फार्मसिस्टची नियुक्ती करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, जनरल सेपेटरी शिवाजी गुंजीकर, ग्राम पंचायत सदस्य महादेव कवळेकर, सागर देसाई, रमेश देसाई, रमेश कौंदलकर आदीसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.