चाहत्याच्या प्रश्नावर केला खुलासा
अलाया फर्निचरवाला हिला सोशल मीडियावर वेळ घालविणे आणि चाहत्यांसोबत संवाद साधणे पसंत आहे. अलिकडेच तिने इन्स्टाग्राम सेशनदरम्यान स्वतःचे जीवन आणि कारकीर्दीशी निगडित गप्पागोष्टी केल्या आहेत. आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला सुंदर म्हणन तिचे कौतुक केले. तुझी कॉस्मेटिक सर्जरी झाली आहे का अशी विचारणा चाहत्याने केली.
कॉस्मेटिक सर्जरी करण्याची हिंमत माझ्यात नाही. ही सर्जरी मी कधीच करवू शकणार नाही. ही शस्त्रक्रिया न करवून घेतल्यास जीवनातील पुढी काळात मी स्वतःचे आभार मानू शकणार आहे. कॉस्मेटिक सर्जरीबद्दल माझ्या मनात भीती असल्याचे अलायाने म्हटले आहे. अलायाने 2020 मध्ये प्रदर्शित ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
माझ्या सर्व चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. यातील काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ज्या कलाकारांसोबत मी काम करत आहते ते अद्भूत आहेत. दीर्घ काळानंतर लोक मला मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे तिचे सांगणे आहे. अलाया पुढील काळात ‘यू टर्न’ या कन्नड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून झळकणार आहे.