जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याचा दिलाय सल्ला
बुधवारी उत्तर कर्नाटक मधील अनेक ठिकाणी. मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पुढील 24 तासात कोस्टल कर्नाटक आणि गोवा एन आय कर्नाटक लगतच्या तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक परिसरात हवामान उपविभागातील काही पानलोट आणि परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पुराचा धोका संभवतो.
पुढील 24 तासात अपेक्षित पावसामुळे खालील नकाशात व सकल भागात पूरस्थिती येऊ शकते असे कळविण्यात आले आहे.
- खानापूर सह बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. तसेच, कधीही अचानक पूर येऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेल्याने खबरदारी म्हणून जनतेने पाण्याच्या ठिकाणी तसेच धबधब्याचे ठिकाणी जाऊ नये, धोका आहे असे त्यांनी सांगितले