सलमान खानच्या बहिणीची मुलगी
पुढील काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे दिसून येणर आहेत. यात सलमान खानची भाची अन् अतुल अग्निहोत्रीची मुलगी अलिजेहचे नाव आघाडीवर आहे. अलिजेह स्वतःच्या वडिलांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोमेंद्र पाधी करणार आहेत. ‘जामताडा’ या वेबसीरिजची निर्मिती पाधी यांनीच केली होती.
अलिजेहच्या या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटात आणखी अनेक नवे चेहरे असणार आहेत. उर्वरित कलाकारांची नावे ठरल्यावर आम्ही चित्रपटाची घोषणा करणार आहोत असे पाधी यांनी म्हटले आहे. अतुल अग्निहोत्री हे बॉलिवूडचे दिग्गज निर्माते म्हणून ओळखले जातात.
अलिजेहने 2008 मध्ये स्वतःच्या वडिलांचा चित्रपट ‘हॅलो’मध्ये काम केले होते. अलिजेहच्या पदार्पणाच्या चित्रपटात नायक म्हणून कुणाची निवड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सलमानच्या या भाचीला मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहेत. अलिजेहला बॉलिवूड पदार्पणासाठी सलमान खानकडून पाठिंबा मिळणार असल्याने हा चित्रपट बिगबजेटचा असू शकतो.