कृष्णा, दूधगंगेची पातळी 1.7 मीटरने घटली : नदीकाठच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास, शेकडो हेक्टर शेतीपिकांचे नुकसान
प्रतिनिधी, वार्ताहर / निपाणी, एकसंबा
पाणलोट क्षेत्रात पडणाऱया मुसळधार पावसामुळे 6 जुलैपासून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. जवळपास पाच दिवस पावसाने धुमशान सुरू केले होते. 15 तारखेपासून पाऊस मंदावला आणि पाणीपातळी घटण्यास सुरुवात झाली. चिकोडी व निपाणी तालुक्मयातील वेदगंगा व दूधगंगा नदीवरील पाण्याखाली गेलेले सर्व बंधारे 21 रोजी वाहतुकीस खुले झाले आहेत. पावसाच्या प्रमाणाबरोबर पाणीपातळीतही मोठी घट झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गुरुवारी दूधगंगा नदीतून 9 हजार 752 क्मयुसेक पाण्याच्या प्रवाहात घट झाली असून 10 हजार 560 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत होता. राजापूर बंधाऱयातून 17 हजार 552 क्मयुसेक पाण्याच्या विसर्गात घट झाली असून 56 हजार 333 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत होता. कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 26 हजार 704 क्मयुसेक पाण्याचा प्रवाह घटला असून 66 हजार 893 क्मयुसेक विसर्ग होत होता. कृष्णा नदीची पाणीपातळी 528.61 मीटर इतकी असून 1.7 मीटरने पाणीपातळी घटली आहे. तर दूधगंगा नदीची पाणीपातळी 532.36 मीटर असून 1.7 मीटर इतकी पाणीपातळी घटली आहे. चिकोडी तालुक्यातील दूधगंगा नदीवरील मलिकवाड -दत्तवाड हा बंधाराही वाहतुकीस खुला झाला आहे.
दूधगंगा, वेदगंगेचे पाणी पात्रात
4 ते 14 जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे निपाणी तालुक्मयातील 5 बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, चार दिवस पाऊस थांबल्यामुळे पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत आहे. दूधगंगा व वेदगंगा या दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. परिणामी, निपाणी तालुक्यातील कारदगा-भोज, भोजवाडी-कुन्नूर, बारवाड-कुन्नूर, सिदनाळ-अकोळ, जत्राट-भिवशी हे बंधारे वाहतुकीस खुले झाले आहेत.
पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे सदर मार्गांवरील बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा पातळीवरील अधिकारी तसेच मंत्र्यांनीही या भागात भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. प्रशासनही दररोज नद्यांच्या वाढणाऱया पाणीपातळीवर लक्ष ठेवून होते. सुदैवाने गेल्या 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी, निपाणी तालुक्मयातील सर्व बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. असे असले तरी अद्याप पावसाळय़ाचे अडीच महिने बाकी आहेत. बुधवारपासून पुष्य नक्षत्रातील अर्थात म्हातारा पाऊस सुरू झाला आहे.