ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. सगळे आमदार अजितदादांसोबत आहेत. सध्या शरद पवारांसोबत असलेले 5-6 आमदारही लवकरच अजितदादांबरोबर येतील, असा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
भुजबळ म्हणाले, अजित पवारांसोबत सध्या 45 ते 48 आमदार आहेत. तर शरद पवारांसोबत उरलेले आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला, तेव्हा त्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे सगळे आमदार अजितदादांसोबतच आहेत. शरद पवार गटातील आमदार लवकरच आमच्यासोबत येतील.
दरम्यान, शरद पवार एकदा अजित पवार आमचेच नेते आहेत, असं म्हणतात. परत विधान बदलतात. अधून मधून शरद पवार अशी गुगली टाकतात, त्या गुगली नेमक्या समजत नाहीत. पण गुगलीवर बँट्समन प्रत्येकवेळी आऊट होतातच असे नाही.