आ . वैभव नाईक आणि शिक्षणमंत्र्यांची सावंतवाडी न .पालिकेत हजेरी
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात काल रात्री पडलेल्या पावसात भेडले माडाचे झाड पडून आंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला . या प्रकरणी आज सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व टेम्पो मालक -चालक संघटनेने व गवळी समाज सावंतवाडीने नगरपालिकेला घेराव घातला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी या ठिकाणी हजेरी लावली. संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला प्रशासकीय अधिकारी टार्गेटवर होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या दोन्हीही तरुणांना आपल्या माध्यमातून वैयक्तिक मदत केली जाईल. तसेच शासनाच्या माध्यमातून मदत देण्यासंदर्भात आपण लक्ष घालेन. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातूनही मदत केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शासनाच्या माध्यमातून शासन स्तरावरून काय मदत मिळते काय या संदर्भात आपण लक्ष घालीन असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, उमाकांत वारंग, राजू बेग ,नासिर शेख, समृद्धी विरनोडकर ,प्राजक्ता केळुसकर , सरपंच अजित परब, तारकेश सावंत, एडवोकेट नीलिमा सावंत गावडे, आनंद नेवगी ,मायकल डिसोजा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.