प्रतिनिधी,कोल्हापूर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात चंदगड विधानसभा मतदारसंघातील कांजिर्णे व गंधर्वगड तसेच शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील वेखंडवाडी अशी तीन मतदान केंद्रे वाढणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या यादीतून हे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 3359 मतदान केंद्रे होणार आहेत. यावर सात दिवसात हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदलाचे, विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रातील 1 हजार 500 मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.या प्रस्तावातील बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास पाठविण्यात येतील.त्यानंतर येथून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रांचे प्रस्तावित सुसुत्रिकरण असे
विधानसभा मतदारसंघ- तालुका- सध्याची केंद्रे-ठिकाणात बदल केंद्रे – नवीन केंद्रे
चंदगड – चंदगड – 198 – 28 – 02
आजरा- 42 – 01 – 00
गडहिंग्लज- 138 – 09 – 00
राधानगरी – राधानगरी – 205 – 02 – 00
भुदरगड – 172 – 02 – 00
आजरा – 47 – 02 – 00
कागल – कागल – 242 – 16 – 00
आजरा – 47 – 02 – 00
गडहिंग्लज – 64 – 00 – 00
कोल्हापूर दक्षिण – कोल्हापूर दक्षिण -326 – 15 – 00
करवीर – करवीर – 227 – 11 – 00
गगनबावडा – 44 – 03 – 00
पन्हाळा – 85 – 01 – 00
कोल्हापूर उत्तर – कोल्हापूर उत्तर – 311 – 09 – 00
शाहुवाडी – शाहूवाडी – 187 – 06 – 00
पन्हाळा – 145 – 04 – 01
हातकणंगले – हातकणंगले – 331 – 22 – 00
इचलकरंजी – इचलकरंजी – 254 – 54 – 00
शिरोळ – शिरोळ – 290 – 91 – 00