विद्याविकास हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
All support for the upliftment of Aros High School – Archana Ghare Parab
आरोस पंचक्रोशी विद्याविकास मंडळ, आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कुल आरोस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उद्धाटन राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी केले .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अथिती म्हणून त्या उपस्थित होत्या . यावेळी जो मान शाळा व सर्व शिक्षकवृंद यांनी दिला त्याबद्दल प्रथमत मी त्यांचे मनापासून आभार मानते . शाळेच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु , अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या .
यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अर्चना घारे परब यांच्या हस्ते पार पडला . वर्षभरात विशेष नैपुण्य गुणात्मक व कौशल्य प्राप्त विद्यार्थ्याचे कौतुक करत सन्मानचिन्हाने त्यांना सन्मानित करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यामध्ये सहभागी होत अर्चना घारेंनी त्यांच्याशी सवांद साधला या कार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणून माजी मुख्याध्यापक अन्वर अब्दुल, रझाक खान महेंद्र पेडणेकर, रोहिदास सावंत , नीलेश परब, राजन नाईक , विद्याधर देसाई नारायण मुळीक श्रध्दा मुळीक यश खोत मदन खोत तसेच संस्थेचे सदस्य पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
न्हावेली / वार्ताहर