मालवण / प्रतिनिधी
श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ येथे 2003-04 च्या इयत्ता १० वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दि. ३ मे रोजी श्रीमती विजयाताई गावकर सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेला वस्तू स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी ही मोठी शक्ती असते त्यामुळे शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि शाळेच्या भौतिक विकासासाठी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला मदत करण्याचे आवाहन यानिमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुहास हिंदळेकर यांनी केले.