वृत्तसंस्था/ बेसिल (स्वीस)
कॅनडाचा टेनिसपटू फेलिक्स ऑगेर ऍलिसिमीने येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील बेसिल खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवताना स्पेनच्या कार्लोस ऍलकॅरेझचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात ऍलिसिमीने स्पेनच्या अलकॅरेझचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. डेन्मार्कचा रुनी आणि स्पेनचा ऍग्युट यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर ऍलिसिमीचा अंतिम सामना होईल. 2022 च्या टेनिस हंगामात आता ऍलिसिमी सलग तिसरे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ऍलिसिमीचा अलकॅरेझवरील हा तिसरा विजय आहे.