‘गॉडफादर’ आणि ‘वाल्टेयर वीरय्या’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर आता मेगास्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट ‘भोला शंकर’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पहिल्यांदाच मेहर रमेशसोबत चिरंजीवी यांनी या चित्रपटासाठी काम केले आहे. हा एक ऍक्शन एंटरटेनर चित्रपट असून यात दिग्गज अभिनेत्याची दमदार भूमिका असणार आहे. निर्मात्यांनी ‘भोला शंकर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चिरंजीवी यांचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 22 ऑगस्ट रोजी चिरंजीवी यांचा जन्मदिन आहे, याचमुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट मोठी पर्वणी ठरणार आहे. निर्मात्यांनी ‘भोला शंकर’च्या प्रदर्शनाच्या तारखेसह याचे पोस्टर सादर केले आहे. चित्रपटात चिरंजीवी यांच्यासह कीर्ति सुरेश आणि तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. कीर्ति सुरेश चित्रपटात चिरंजीवी यांच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. ‘भोला शंकर’ तमिळ चित्रपट ‘वेदलम’चा अधिकृत तेलगू रिमेक असणार आहे. ‘वेदलम’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार, लक्ष्मी मेनन आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत होते.
Previous Articleपन्नीरसेल्वम यांना आणखी एक झटका
Next Article वादग्रस्त विधेयकाप्रकरणी इस्रायल सरकारची माघार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.