कोर्टरुम ड्रामामध्ये साकारणार अभिनय
अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अमिताभ यांनी स्वतःच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली ओ. बिग बी यांचा पुढील प्रोजेक्ट ‘सेक्शन 84’ असणार आहे. रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत तयार होणाऱया या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता करणार आहेत. यात कोर्टरुम ड्रामा दर्शविण्यात येणार आहे. बिग बी यांनीच सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याने दिग्दर्शक रिभु दासगुप्ता अत्यंत आनंदी आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला सन्मानित झाल्याचे वाटतेय असे रिभुने नमूद पेले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील काही काळात सुरू केले जाणार आहे. अमिताभ बच्चन हे अलिकडेच अन्य चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाले होते. यातून ते पूर्ण बरे झाल्यावर नव्या चित्रपटाचे काम हाती घेतले जाणार आहे. सेक्शन 84 या चित्रपटातील अन्य कलाकारांसंबंधी अद्याप माहिती समोर आलेली नाही.