कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कारवाई
बेळगाव : रायबाग तालुक्यातील कंकणवाडी चेकपोस्टवर सोमवारी सायंकाळी 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम कोल्हापूर येथील एका बँकेशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेशी संबंधित वाहनातून रक्कम नेण्यात येत होती. आर्थिक संस्था किंवा बँकेशी संबंधित रक्कम ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गसूचीचे पालन केले नाही म्हणून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईसंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून सोमवारी एकूण तीन ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली आहे.