दिग्दर्शक अनुराग बासू यांचा चित्रपट
अनुराग बासू यांचा चित्रपट ‘मेट्रो… इन दिनों’च्या प्रदर्शनाची तारीख तसेच कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अनेक दमदार कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. परंतु ‘लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटात भूमिका साकारलेल्या इरफान खान यांची उणीव नव्या चित्रपटात प्रेक्षकांना जाणवणार आहे.
मेट्रो प्रेंचाइजीचे चित्रपट महानगरांमध्ये राहणाऱया लोकांचे जीवन दर्शविणारे आहेत. या प्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘मेट्रो… इन दिनों’ची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच नव्या चित्रपटातही अनेक कलाकार दिसून येतील. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्याकडून केली जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटाला प्रीतम यांचे संगीत लाभणार आहे.
2007 मध्ये प्रदर्शित ‘मेट्रो’मध्ये धर्मेंद्र, नफीसा अली, शिल्पा शेट्टी, के.के. मेनन, शाइनी आहुजा, कोंकणा सेन शर्मा, कंगना रनौत, शरमन जोशी, इरफान खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पहिल्या चित्रपटातील केवळ कोंकणा सेन शर्मा नव्या चित्रपटात सामील असणार आहे. अनुराग बासू याचबरोबर ‘आशिकी’ प्रेंचाइजीवर काम करत आहेत. याच्या तिसऱया भागाचे दिग्दर्शन तेच करणार आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे.