वृत्तसंस्था/ माद्रीद
रविवारी येथे ला-लीगा फुटबॉल स्पर्धेतील रियल माद्रीद आणि रियल सॉसीदाद यांच्यातील अटीतटीचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या सामन्यात रियल माद्रीद आणि रियल सॉसीदाद या दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या पण त्या वाया गेल्या.
रियल माद्रीदतर्फे या सामन्यात गोल करण्याच्या 20 संधी गमावल्या तर रियल सॉसीदादने गोल करण्याच्या सात संधी वाया घालविल्या. आता या स्पर्धेत गुणतक्त्यात बार्सिलोना संघ 47 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने गिरोनाचा 1-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेत रियल माद्रीद 42 गुणांसह दुसऱ्या तर रियल सॉसीदाद 39 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.